उदात्त हेतू मनात ठेवून घडवून आणलेल्या क्रांतीतून जन्माला आलेले शासकही लोभी , स्वार्थी ,कपटी , निर्दयी आणि प्रजेला नाडणारे असू शकतात याचे विदारक परंतु आपल्या अवती भवती पाहायला अनुभवायला मिळणारे वास्तव कादंबरी सांगते. या कादंबरीचे वैशिष्ट्ये म्हणजे मानवी स्वभावाच्या सर्व पैलूंचे प्रतिबिंब असणारे प्राणी मानवी पद्धतीनेच संवाद आणि काम करतात. यात प्राण्यांवरील अन्याय आणि अत्याचारासोबतच शोषणाची कहाणी असून त्याला जबाबदार माणूस असल्याचे प्राण्यांचे मत बनते. त्यामुळे मग सुरु झालेला क्रांतीचा बंड कशा पद्धतीने वेगवेगळे वळणे घेत परत शोषणाचाच भाग बनतो ते चपखलपणे हि कादंबरी दाखवून देते.
उपरोधिक आणि नर्मविनोदी शैलीतील लिखाण या कादंबरीला वाचनीय बनवते. कादंबरी अनेक ठिकाणी हे प्रकर्षाने जाणवते कि आपण जरी प्राण्यांच्या बाबत वाचत असलो तरी हे आपल्या याबाबतही घडत आहे. अनेकदा सामूहिक हितासाठी नियमावली बनवली जाते आणि ती ते नियम सर्वांना लागू असल्याचे बोलत त्या नियमांना हळूहळू नियम निर्मातेच कसे सोयीने बगल देतात आणि "सर्व प्राणी सामान आहेत " याचे रूपांतर "सर्व प्राणी सामान आहेत पण काही प्राणी जास्त सामान आहेत " असे होते. कादंबरीत हा सोयीस्कर स्वार्थी स्वभाव प्राण्यांच्या बाबत असल्याचे दिसत असले तरी ते प्राणी म्हणजे आपणच आहोत हे तीव्रतेने जाणवते आणि पुस्तक संपेपर्यंत तर हि कथा माणसाचीच असल्याचे वाचकाला कळून चुकते. नेहमीच स्वतःची चिकित्सा करणे कठीण असते परंतु दुसऱ्याची चिकित्सा सहज होते . म्हणूनच स्वतःचे जगणे इतरांच्या रूपात बघत शेवटी अचानक द्या सर्व दुटप्पीपणाचा साक्षात्कार करण्यात हि कादंबरी यशस्वी होते.
मिश्किल शैलीत लिहिलेल्या या कादंबरीत , बऱ्याचदा 'एखाद्या घटनेचा कर्ता करविता कोण' याचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही , पण वाचकांनी स्वतःच अर्थ लावायचा आहे आणि तर्क करायचा आहे. त्यामुळे हि कथा आणखीनच रसपूर्ण बनते. शैलीतील नर्मविनोद किती मर्मभेदक होतो याचा परिचय हि कादंबरी करून देते. शत्रूशी लढता लढता शत्रूसारखे बानू नका हा संदेश तर खूप काही सूचित करून जातो. आयुष्यातील सर्व दुःखाचे कारण हुकूमशाहीच्या आहे हे हुकूमशाहीविरोधी आवाज न करणाऱ्या, भिणाऱ्या आणि स्वार्थ असणाऱ्या सर्वांनाच त्याचे परिणाम कसे भोगावे लागतात याचेही वर्णन येथे दिसते.
आधुनिकीकरण, यंत्र, श्रम यांचा खेळ आयुष्य संपवण्यात खूप मोठा वाट उचलतो हे प्रखरपणे समोर येते. 'ओल्ड मेजर' या आपल्या पूर्वजांच्या कावतीचेही प्रतीक होते आणि त्या कवटीला सलामी देताना, जिवंतपणी त्या कवटीतून आलेल्या विचारांना मात्र काहीच जागा उरात नाही. सर्व सामान्यपणे फिरणारे नेतृत्व लष्करी थाटात रूढपणे आदेश देत सहभागी पद्धतीचा शेवट होतो. आपल्या मुख्य सोबत्यांच्या "कॉम्रेड (साथी , सोबती) ते नेताजी" असा होणार प्रवास विचारांना अधिक गती देत सत्ता आणि स्वार्थ यांचे अनेक नवे अर्थ सांगतो.
कादंबरीतील प्राणी पात्र आणि त्यातही विशेषतः डुक्कर जे अधिक बुद्धिमान दाखवले आहे ते कादंबरीच्या शेवट पर्यंत माणसाचीच प्रतिकृती होते आणि एका क्रांतिकारी पर्वाचा सामान्य शेवट होतो.
पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव - अॅनिमल फार्म
लेखक - जॉर्ज ऑरवेल

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा