पत्रकारितेच्या अभ्यासक्रम अंतर्गत झालेली ही पहिली भेट. भेटीतील हा अनुभव जसा भौगोलिक अनुभव देणारा होता, तसाच तो मित्रांना समजून घेण्याचाही होता. अशा मोकळ्या वातावरणात सर्वांशी मस्तीही करता आली आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातील आवश्यक चर्चाही झाल्या. कोयना प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे ही प्राथमिक माहिती जरी अनेकांना असली तरी त्याची प्रत्यक्ष अनुभूती मात्र खूप कमी जणांना होती. त्या मोजक्या मित्रांपैकी ओंकार वाबळे या मित्राला या प्रकल्पाचा विस्तृत अनुभव होता, कारण तो याअगोदर तीन दिवसीय भेटीला जाऊन आलेला होता. यात त्याला पुरेसा वेळ देत तांत्रिक आणि जमिनीवरील गोष्टी समजून घेता आल्या होत्या. त्याने सुरुवातीपासूनच स्वतःचे ते अनुभव सर्वांना सांगायला सुरुवात केली होती त्यामुळे त्याचीही खूप मदत झाली.
कोयना हे भेटीचे मुख्य ठिकाण असले तरी, प्रवासादरम्यान येणारे एक ठिकाण "बारा मोटीची विहीर" हेही पाहायचे ठरले. तेथे भेट दिली व त्या पूर्ण ऐतिहासिक ठेव्याची माहितीही घेतली. त्या विहिरीच्या वैशिष्ट्यांमध्ये सर्वात महत्वाचे वाटले ते म्हणजे त्याकाळचे बांधकामाचे तंत्र.
या भेटीनंतर पुन्हा प्रवास सुरु झाला तो कोयना प्रकल्प भेटीचा. कोयना प्रकल्पावर पोहचल्यावर तेथील एकूणच सर्व नैसर्गिक समृद्धता आणि धरणाचे अस्तित्व असा निसर्ग - मानवनिर्मित परिसर बघायला मिळाला. भेटीसाठी भारतीय व्यवस्थेप्रमाणे अनेक कागदोपत्री घोडे मिरवणे हे बंधनकारक असल्याने त्या सर्व प्रक्रियेला दुपारचे महत्वाचे ३-४ तास खर्च झाले. भेटीची वेळ ५ वाजता संपणार आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगितले होते. त्यामुळे भेट होणार की नाही अशी स्थिती तयार झाली. शेवटी शिक्षकांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ४.५० वाजता भेट दिली गेली. मोबाइल फोन वापरण्यास बंदी असल्याने मग तसेच गेलो. तेथे वर्गमित्र ओंकार, प्रा. संदीप नरडीले यांनी काही माहिती दिली.
शेवटी कोयना प्रकल्पाचे अनिल राणे या स्थापत्य अभियंत्याने आम्हा सर्वांना या प्रकल्पाची माहिती दिली ज्यात सर्वात जास्त माहिती ही तांत्रिक स्वरूपाची होती. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या मित्रांना तांत्रिक भाग न समजणारा झाला. तरीही त्या अभियंत्याने सामाजिक, राजकीय आणि एकूणच आर्थिक विषयांवर जी मते मांडली ती सर्वांनाच समजली. त्यामुळे अनेकजण प्रभावितही झाले, ज्यात माझाही समावेश होता. पण विस्थापितांचा प्रश्न हा केंद्र बिंदू ठेऊन प्रा. अभिषेक भोसले आणि प्रा. प्रवीण खुंटे यांनी विचारलेले प्रश्न जास्त महत्वाचे वाटले.
"बारा मोटीची विहीर" :
कोयना हे भेटीचे मुख्य ठिकाण असले तरी, प्रवासादरम्यान येणारे एक ठिकाण "बारा मोटीची विहीर" हेही पाहायचे ठरले. तेथे भेट दिली व त्या पूर्ण ऐतिहासिक ठेव्याची माहितीही घेतली. त्या विहिरीच्या वैशिष्ट्यांमध्ये सर्वात महत्वाचे वाटले ते म्हणजे त्याकाळचे बांधकामाचे तंत्र.या भेटीनंतर पुन्हा प्रवास सुरु झाला तो कोयना प्रकल्प भेटीचा. कोयना प्रकल्पावर पोहचल्यावर तेथील एकूणच सर्व नैसर्गिक समृद्धता आणि धरणाचे अस्तित्व असा निसर्ग - मानवनिर्मित परिसर बघायला मिळाला. भेटीसाठी भारतीय व्यवस्थेप्रमाणे अनेक कागदोपत्री घोडे मिरवणे हे बंधनकारक असल्याने त्या सर्व प्रक्रियेला दुपारचे महत्वाचे ३-४ तास खर्च झाले. भेटीची वेळ ५ वाजता संपणार आहे असे अधिकाऱ्यांकडून सांगितले होते. त्यामुळे भेट होणार की नाही अशी स्थिती तयार झाली. शेवटी शिक्षकांनी शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर ४.५० वाजता भेट दिली गेली. मोबाइल फोन वापरण्यास बंदी असल्याने मग तसेच गेलो. तेथे वर्गमित्र ओंकार, प्रा. संदीप नरडीले यांनी काही माहिती दिली.
कोयना धरण प्रकल्प :
शेवटी कोयना प्रकल्पाचे अनिल राणे या स्थापत्य अभियंत्याने आम्हा सर्वांना या प्रकल्पाची माहिती दिली ज्यात सर्वात जास्त माहिती ही तांत्रिक स्वरूपाची होती. त्यामुळे कोणत्याही तांत्रिक शिक्षणाची पार्श्वभूमी नसलेल्या मित्रांना तांत्रिक भाग न समजणारा झाला. तरीही त्या अभियंत्याने सामाजिक, राजकीय आणि एकूणच आर्थिक विषयांवर जी मते मांडली ती सर्वांनाच समजली. त्यामुळे अनेकजण प्रभावितही झाले, ज्यात माझाही समावेश होता. पण विस्थापितांचा प्रश्न हा केंद्र बिंदू ठेऊन प्रा. अभिषेक भोसले आणि प्रा. प्रवीण खुंटे यांनी विचारलेले प्रश्न जास्त महत्वाचे वाटले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा